साताऱ्यातील प्रसाद चौघुले राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम

0

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला.

सर्वसाधारण वर्गातून प्रसाद चौघुले प्रथम, उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आणि अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटीलने महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

एमपीएससीतर्फे १३ ते १५ जुलै, २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ४२० विद्यार्थी पात्र झाले आहेत.