साताऱ्यात मुसळधार पाऊस; ओढे, नाले तुडूंब

0

सातारा – साताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात आज मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. माण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत.

माण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी हजेरी लावलेल्या पावसाने आज पहाटेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, दहिवडी, वावरहिरे, डंगीरेवाडी, शेवरी, दानवलेवाडी, हस्तनपूर, बिजवडी, पांगरी, बिदाल, शिंदी, वारुगड, मलवडी, कुळकजाई या ठिकाणी पाऊस पडत आहे.

गेली वर्षभर शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहात होता. अनेक ठिकाणी पेरणी झाली नव्हती. पेरणी झाली होती तेथील पिके जळून चालली होती. या पावसामुळे जनावरांचा चारा प्रश्न थोडा फार मिटू शकतो. गावोगावचे बंधारे भरल्याने शेतकरी सुखावला आहे.