सातोड गावातून भरदिवसा 45 हजारांची रोकड लांबवली

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील सातोड येथील गरीब शेतकर्‍याच्या घरातून 45 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याची घटना 26 रोजी सकाळी 10 ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मुक्ताईनगर पोलिसात फिर्यादी देवराम झांगो बेलदार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. कपाशीचे विक्री करून आलेली रक्कम घरातील धान्याच्या कोठीत ठेवली होती. बेलदार कुटुंब शेतात गेले असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून घराचे कुलूप तोडून तसेच त्यातील 45 हजारांची रक्कम लांबवली. चोरीची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माणिकराव निकम, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत महाजन यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.