सात दिवसीय हिवाळी शिबीराचे आयोजन

0

जळगाव : शहरातील एच.जे.थीम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष सात दिवसीय हिवाळी शिबिराचे आयोजन. शिरसोली येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत फौजी उत्तम बारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.अ.करीम सालार, प्रमुख पाहुने हाजी गफ्फर मलिक, डॉ. इकबाल शाह, डॉ. ताहेर शेख उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीरामध्ये श्रमदान, स्वच्छता अभियान बौध्दिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. करीम सालार, फौजी उत्तम बारी, प्राचार्य डॉ.शूजाअत अली, हाजी गफ्फर मलिक, डॉ.इकबाल शाह यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.सदाशिव डापके तर आभार डॉ.वाय.ई.पटेल यांनी केले. सुत्रसंचालन जैनब पटेल,यांनी केले. अएशा बासित, उप. प्राचार्य प्रा.पिंजारी आय.एम, अख्तर शाह, डॉ.राजेश भामरे यांनी मार्गदर्शन केले.