सात नक्षलवाद्यांचा खात्मा

0

गडचिरोली : गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात झिंगानूर परिसरात पोलिसांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून, मोठा शस्त्रसाठा व प्रचारसाहित्यही जप्त करण्यात आले आहे. कल्लेड जंगलात बुधवारी पहाटे ही चकमक झाली. जिल्हा पोलिस व सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले आहे. कल्लेड जंगलात नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता पोलिसांचा नक्षलवाद्यांशी आमना-सामना झाला. त्यात सात नक्षलवादी मारले गेले.