सात महिन्यांनी दीपनगरातून संच क्रमांक तीनमधून वीज निर्मितीला सुरुवात

0

भुसावळ- कोळसा टंचाई व एमओडीमुळे बंद झालेला दीपनगरातील 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन तब्बल सात महिन्यांनंतर शुक्रवारी पहाटे कार्यान्वित झाला असून आता दीपनगरातील तीन संचातून तब्बल 1063 मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. संच क्रमांक तीन एमओडीतून बाहेर निघून कार्यान्वित झाला असून पाचशे मेगावॅटचे संच क्रमांक चार व पाच असे तीन संचातून आता वीज निर्मिती होत आहे. संच क्रमांक तीनचा कोळसा खासगी उद्योगाकडे वळवल्याने कोळशाची टंचाई निर्माण झाल्यानंतर 23 मे पासून हा संच बंद होता तर महानिर्मितीने केलेल्या करारानुसार खासगी उद्योगास कोळशाचा पुरवठा करणे आता बंद झाला आहे. याच कालावधीत हा संच मेरीट ऑर्डर डिस्पॅचमधून बाहेर निघाल्याने शुक्रवारी पहाटे हा संच लाईटअप करून वीजनिर्मितीला सुरुवात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.