लंडन । मला गुगल मध्ये नोकरी करायची आहे कारण त्या कंपनीत बीन बॅग्ज आणि गो कार्टस ही आहे. आणि माझे कॉप्युटरचे ज्ञानही उत्तम आहे, असे माझे बाबा म्हणतात. मग देणार ना तुम्ही मला नोकरी? तसे तर मला चॉकलेट फॅक्टरीतही काम करायला आवडेत, आणि मला ऑलिम्पिक स्वीमरही बनायचे आहे, पण तरीही मी गुगलमध्ये नोकरी करेन, अशा आशयाचे पत्र थेट गुगलच्या सीईओ सुंदर पिचई यांना लिहले आहे, तेही चक्क एका सात वर्षीय क्लोई वॉटरबर्ग या चिमुकल्या मुलीने. विशेष म्हणजे अत्यंत बीझी शेड्युल असणार्या सुंदर पिचई यांनी या पत्राची दखलही घेतली आहे, आणि या पत्राला तितकेच साजेसे, समंजस असे उत्तरही दिले आहे. तूझ्या शाळेचे शिक्षण पूर्ण झाले की गुगलकडे तुझ्या नोकरीचा अर्ज नक्की पाठव. मी तुझ्या अर्जाची वाट बघतो आहे. पण त्याचबरोबर पुढच्या काही काळात स्वत:वर अशीच मेहनत घे आणि आपल्या स्वप्नांचा सतत पाठलाग कर, असा पालकत्वाचा सल्ला दिला आहे. पिचई यांनी हे पत्र नुकतेच सोशल मिडीयावर शेअर केल्याने या पत्राची आणि पिचईंनी दिलेल्या उत्तराचे सध्या नेटीझन्सकडून स्वागतच होते आहे.
गूगल जगातल्या सर्वोत्तम कंपनीपैकी एक. या कंपनीत काम करण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी युकेमध्ये राहणा-या क्लोई या सात वर्षांच्या मुलीने सुंदर पिचईंना पत्र लिहिले होते. हौसेने लिहिलेल्या या पत्राला चक्क सीईओंचा रिप्लाय येईल अशी कल्पना तिच्या कुटुंबियांनी देखील केली नसेल. युकेमध्ये राहणा-या क्लोईने आपल्या पत्रात लिहिले आहे की, गुगलमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न आहे. म्हणूनच मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझ्या वडिलांनी या कंपनीत अर्ज करायला सांगितला आहे मला पुढची प्रक्रिया माहित नसल्याने मी पत्र लिहित आहे असे पत्र चिमुकल्या क्लोईने गुगलला लिहिले होते याचबरोबर आपल्या छोट्या आवडी निवडी आणि छंदही तिने सांगितले. तिच्या वडिलांनी तिला रोबोट आणि कम्प्युटर देखील घेऊन दिला हेही सांगायला ती विसरली नाही.
अनपेक्षित उत्तर आले
या पत्राबाबत क्लोईच्या वडीलांनी स्पष्ट केले आहे की, क्लोई मला माझे काम नीटपणे करू देत नव्हती, ती सातत्याने मी खूप शिकले तर मला नोकरीकरता कोणती कंपनी चांगली असेल, कोणत्या कंपनीत मला नोकरी करताना खेळताही येईल, असे प्रश्न विचारत होती. म्हणूनच एक दिवस मी तिला नोकरी करण्याकरिता तुझ्यासाठी गुगल ही कंपनी योग्य आहे, असे सांगितले. यावर तिने गुगलला पत्र लिहायचे ठरवले. खरे तर हे पत्र आम्ही मेल केल्यावर विसरूनही गेलो होतो, मात्र सुंदर पिचई यांनी त्याला खूप योग्य आणि क्लोईला प्रोत्साहन देणारे उत्तर दिल्याने आमचे गुगलविषयीचे प्रेम वाढले आहे.