जळगाव। शहरातील मोहाडीरोड खुबचंद टॉवर नगरातील रहिवासी सात वर्षीय चिमुरडीवर आपर्टमेंट मधीलच एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन संशयीतांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे.
संशय आल्याने ठोठाविले दार
जळगाव मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवर येथील एका अपार्टमेंट मधील रहिवासी सात वर्षीय पिडीता, आईवडीलांसह वास्तव्यास आहे. वडील उच्च शिक्षीत, आई गृहीणी आणि कुटूंबात लहानी एकवर्षाची बहीण यांच्या सोबत राहते. त्याच्याच बिल्डींग मध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या हिरामण बारकु चौधरी (वय-42) याने पिडीतेच्या वडीलांची दुचाकी नेली होती. दुचाकीची चावी परत घेण्यासाठी 15 रोजी दुपारी अडीच वाजता पिडीता त्याच्या घरी गेल्यावर घरात कुणीच नसल्याने त्याने या लहान मुलीला घरात बोलावून तीच्याशी अंगलट करुन अत्त्याचार केला, मुलगी अजुन कशी परत आली नाही म्हणुन पिडीतेच्या आईने शोध घेत संशयीत हिरामण चौधरीचे दार ठोठावले. आतून कडी लावली असल्याने दार ठोठावल्याने आतून पिडीतच्या रडण्याचा आवाज स्पष्ट येत होता.
धक्का मारून संशयीत फरार
जोर-जोरात दार उघडून आरडा ओरड केल्यावर संशयीताने दार उघडले, दारात उभ्या मुलीच्या आईला धक्का मारुन संशयीत हिरामण चौधरी स्वत:चे घर उघडे सोडून पळून गेला. असह्य मुलीला उचलून तीच्या आईने विचारणा केल्यावर घडला प्रकार समोर आला. पिडीताच्या आईने औद्योगीक वसाहत पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार अधीनीयमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहे.