रावेर। तालुक्यातील केर्हाळे खुर्द येथे नागोरी नदीपात्रात सर्फराज तुरेबाज तडवी (रा.खिरोदा) हा दारु विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास काळे यांनी उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, विनोद खंडारे कर्मचार्यांना कारवाईसाठी पाठवले.
पोलीसांच्या या पथकाने नागोरी नदीपात्रात अचानकपणे धाड टाकून तडवीकडून 7 हजार 200 रुपये किमतीच्या देशी दारुच्या दीडशे बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत.