साथीच्या रोगांचा फैलाव, उपाययोजना नाही

0

हडपसर : हडपसर, ससाणे नगर, काळे पडळ, सय्यद नगर, महंमदवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, या भागांत सतत पडणार्‍या पावसामुळे अस्वच्छता, कचरा, साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पादन केंद्रे निर्माण होऊन डेंगू, मलेरिया या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना महापालिका प्रशासन उपाययोजना करण्यास टाळाटाळ करीत आहे. नुकताच ससाणेनगरमधील मनीषा सोमुसे या 32 वर्षीय डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.हडपसर : हडपसर, ससाणे नगर, काळे पडळ, सय्यद नगर, महंमदवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, या भागांत सतत पडणार्‍या पावसामुळे अस्वच्छता, कचरा, साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पादन केंद्रे निर्माण होऊन डेंगू, मलेरिया या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना महापालिका प्रशासन उपाययोजना करण्यास टाळाटाळ करीत आहे. नुकताच ससाणेनगरमधील मनीषा सोमुसे या 32 वर्षीय डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

याशिवाय डेंग्यूचे आणखी तीन रुग्ण आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ससाणेनगरमधील प्रियांका वाडकर (वय 38) यांना अज्ञा हॉस्पिटलमध्ये तर नक्षत्रा वाडकर (वय 12) व नीरज वाडकर (वय 10) यांना श्रेयस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात घेऊन ससाणेनगर नागरी कृती समितीने हडपसर सहायक आयुक्त कार्यालय कीटक प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून अधिकार्‍यांकडे विचारणा केली. तसेच धूर फवारणी व डास उत्पादन केंद्रे नष्ट होण्याची मागणी केली. पण पालिकेचे अधिकारी तोंडी आश्वासन देत आहेत, मात्र काही कार्यवाही झाली नाही.

सक्षम यंत्रणा राबविण्यात अपयशीमहापालिका नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल करते पण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना मात्र राबवित नाही, दैनंदिन सुविधा देण्यास महापालिकेला अपयश येत असताना आपत्कालीन यंंत्रणा कशी राबविणार असा सवाल निर्माण झाला आहे.बाळासाहेब राजे जाधव, व्हिजन हडपसर सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी अतिशय निष्काळजी आहेत  कीटक प्रतिबंधक अधिकारी बांदल यांना दोन दिवसांपासून दूरध्वनी करूनही तो ते घेत नाहीत. यावरून पालिकेचे अधिकारी किती गंभीर आहेत हेच दिसून येत आहे. ससाणेनगर नागरी कृती समितीने हडपसर सहायक आयुक्त संध्या गागरे यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण हडपसर भागात धूर फवारणी करून संभाव्य साथीच्या रोगांचा धोका टाळावा अशी मागणी केली आहे.यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. –मुकेश वाडकर, सामाजिक कार्यकर्ते

शहरातही डेंग्यूचा फैलावपुणे : शहरातही साथीच्या रोगांचा झपाट्याने फैलाव होत असून बुधवारी एकाच दिवशी डेंग्यूची लागण झालेले 11, चिकनगुनियाचे 3 रुग्ण, तर मलेरियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे घरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखून पाणी साठू न देण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे एकूण 86 रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी जुलै महिन्यात सर्वाधिक 58 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात वडगाव शेरी, येरवडा व ढोले पाटील भागात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.  तर गेल्या सात महिन्यांत चिकनगुनियाचे 112 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी जानेवारी महिन्यात 36 रुग्णांना लागण झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात 20 जणांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. डासांमुळे संसर्ग होणार्‍या मलेरियाचेही जानेवारीपासून 5 रुग्ण आढळले असून, यांपैकी 4 रुग्ण जुलै महिन्यात तर मार्च महिन्यात एक रुग्ण आढळून आला होता. वडगाव शेरी, येरवडा-कळस धानोरी, ढोलेपाटील रस्ता, शिवाजीनगर या भागात सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत.

महापालिकेने केलेल्या पाहणीनुसार 19 जूनपासून 3 हजार 279 सार्वजनिक ठिकाणी तर 8 हजार 753 खासगी ठिकाणी डास उत्पत्तीची स्थळे आढळली आहेत. तर 2 लाख 32 हजार 260 खासगी व 65 हजार 47 ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे, तर 4  हजार 192 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 1 लाख 490 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

नागरिकांचे सहकार्य नाही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याने सध्या पालिकेतर्फे घरोघरी फवारणी केली जात आहे. मात्र या फवारणीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेचे कर्मचारी तपासणी व औषध फवारणीसाठी आल्यास नागरीक त्यांना घरात प्रवेश करण्यास साफ नकार देत आहेत. आतापर्यंत 3 हजार 88 जणांनी पालिकेला सहकार्य केले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.