वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांची भावना ; पदभारानंतर मातोश्रींना खुर्चीवर बसवले
वरणगाव : गेल्या 25 वर्षांपासून ज्यांच्या सोबत खांद्याला खादा लावून काम केले त्यांनी ऐनवेळी सात सोडल्याचे मनात अतीव दुःख व खंत आहे. असे असलेतरी अखेरच्या श्वासापर्यंत भाजपाचाच झेंडा मिरवू व वरणगावात कमळ फुलण्यासाठी तसेच शहर विकासासाठी यापुढे आपले आयुष्य खर्ची घालू, असे भावनिक उद्गार नूतन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे काढले. गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. प्रसंगी त्यांनी आपल्या मातोश्री रुख्मिणी काळे यांना आदराने खुर्चीवर बसवले.
यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष शेख अरवलाक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते राजेंद्र चौधरी, विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, प्रतिभा चौधरी, शिवसेना नगरसेविका शशी कोलते, अपक्ष मेहनाज बी.पिंजारी, माला मेढे, सामाजिक कार्यकर्ता संजू कोलते, मिलिंद मेढे, राजेंद्र गुरचळ, शामराव धनगर, अल्लाउदीन शेठ, नामदेव मोरे, डॉ.बापू जंगले, रमेश काळे, रुख्मिणी काळे आदींची उपस्थिती होती.