साध्वी प्रकरणावरून नितीश यांचा भाजपला घरचा आहेर

0

पाटणा: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांना थोर देशभक्त म्हटल्याने त्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपता संपत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला घरचा आहेर देत साध्वी यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करावा, असे म्हटले आहे. आज ते पटना येथे मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी सवांद साधताना त्यांनी हे विधान केले.

साध्वी प्रज्ञा सिन्ह्य ठाकूर यांच्यावर काय कारवाई करावी, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असून त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. साध्वी यांचे ते वक्त्यव्य निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही, असे नितीशकुमार म्हणाले. साध्वी यांच्या वक्तव्यानंतर देशभरातील विरोधी पक्षानी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी साध्वी यांचे वक्त्यव्य वैयक्तिक आहे अशी सारवासारव केली होती. पुन्हा टीका झाल्यानंतर भाजपने साध्वीला नोटीस बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचार सभेत साध्वीला कधीच त्या वक्त्यव्या वरून माफ करणार नसल्याचे म्हटले होते.