साध्वी प्रज्ञासिंह यांचा अर्ज दाखल

0

भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळमधून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसचे दिग्विजयसिंह यांच्या विरोधात त्या निवडणूक लढत आहे.

सध्या २६/११ च्या हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या देशभरात चर्चेत आहे.