मुंबई । मुक्ता दळवीने साना डिसोझाचा पराभव करत जेव्हीपीजी ऑल मुंबई फोर स्टार टेबल टेनिस स्पर्धेतील कॅडेट मुलींच्या एकेरी लढतीतील उपांत्य फेरीत स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत मुक्ताने पहिला गेम 11-9 असा जिंकला. पण दुसर्या गेममध्ये सानाने 11-8 असा जिंकत रंगत निर्माण केली. याबरोबरीनंतर मुक्ताने पुढचे दोन्ही गेम 11-7, 11-3 असे जिंकत आव्हान कायम राखले. या गटातील अन्य लढतींमध्ये अनन्या चांदेने मृणाल कराडेचा 11-6, 11-9, 11-8 असा पराभव करत उपांत्य फेरीतले स्थान निश्चित केले. हार्दी पटेलने श्रावणी लोकेवर 11-2, 11-8, 11-8 असा विजय मिळवला. दुसर्या मानांकित पर्ल अमलसादवालाने केईशा झवेरीचे आव्हान 11-8, 15-13, 11-5 असे संपुष्टात आणले.