सानियाची आठव्या स्थानावर झाली घसरण

0

नवी दिल्ली । भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची ताज्या डब्ल्युटीए क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. इटालियन ओपनमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे सानियाची एका स्थानाने घसरण झाली आहे. रविवारी झालेल्या इटालियन ओपनमध्ये महिला दुहेरीत तैवानची यांग जान व मार्टिना हिंगीस यांनी जेतेपद पटकावले.

या जेतेपदाचा हिंगीसला फायदा झाला असून ताज्या क्रमवारीत हिंगीसने दोन स्थानांनी प्रगती करताना सहावे स्थान पटकावले आहे. उपांत्य फेरीतील पराभवामुळे सानियाला एका स्थानाचा फटका बसला असून तिची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. पुरुष दुहेरी गटात रोहन बोपन्ना 22 व्या तर लियांडर पेस 52 व्या स्थानी कायम आहेत.