चेन्नई । अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने 2017 च्या टेनिस हंगामासाठी दुहेरीतील आपली नवी साथीदार म्हणून कझाकस्तानच्या शेडोव्हाची निवड केली आहे. शेडोव्हा समवेत या वर्षीच्या हंगामात आपण चांगली कामगिरी करू असा विश्वास सानियाने व्यक्त केला.
सानियाची बहीण अनाम हिने येथे आयोजिलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन सानियाच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ती बोलत होती. सानियाची यापूर्वीची साथीदार झेकची स्ट्रायकोव्हा हिच्याबरोबर सानियाचे काही बाबतीत मतभेद झाल्याने या दोघीमधील करार काही आठवडयापूर्वीच संपुष्टात आला. सानिया आणि स्ट्रायकोव्हा यांनी दहा स्पर्धामध्ये दुहेरीत खेळ केला. शेडोव्हा ही दर्जेदार टेनिसपटू असून तिने काही ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. आता आम्ही दोघी दुहेरीत भविष्य काळात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास सानियाने व्यक्त केला.