जळगाव । रावेर तालुक्यातील सावदा येथील खंडेलवाल पिता-पुत्र केळी निर्यातदारांना 2 कोटी 81 लाख रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी उपोषणार्थी सानिया कादरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेव व्हावेत अशी मागणी करत जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेत निवेदन दिले. उपोषणकर्त्या सानिया कादरी यांच्या प्रकृतीची व सावदा येथे करण्यात येणार्या रास्ता रोको, आंदोलन व मोर्चामुळे निर्माण होणार्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला. मुकुंद सपकाळे, विवेक ठाकरे, रमाकांत तायडे, शिवराम पाटील, कॉ. अनिल नाटेकर, शकिल शेख, शाम इंगळे, शेख आशिक, किरण वाघ, मिलिंद तायडे, राजेश, राजेश पुनासे, रणजितसिंग पाटील, पंकज तायडे, दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते.