सावदा । सावदा येथील पोलीस स्टेशन समोर 6 जुलै पासून भुसावळ येथील व्यवसाईक सानिया कादरी यांनी सावदा सावदा येथील व्यापारी मयूर खंडेलवाल तसेच कैलास खंडेलवाल या पिता पुत्रान विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा म्हणून उपोषण सरू केले होते दरम्यान 8 दिवस झाल्या नंतर देखील गुन्हा दाखल होत नसल्याने कादरी यानी दि 13 रोजी आपले सरू असलेले उपोषण मागे घेत ऐनपुर, ता. रावेर येथील प्रगतीशील शेतकरी रामदास नारायण महाजन यांचे हस्ते उपोषण सोडले, तसेच हे उपोषण सोडले असले तरी याप्रकरणी आता शेतकर्यांसह 15 जुलैपासून आपण पुन्हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण कायदेशीर मार्गाने सदर फसवणूक केलेल्या खंडेलवाल यांचे विरुद्ध लढा देत असून सावदा येथे उपोषण 8 दिवासांपासून सुरु असतांना देखील अद्याप पावेतो गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणून हा लढा आता जळगाव येथून सुरु राहील, असे सागंत पोलीस देखील इतके असल्यावर व पुरावे दिल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सावदा पो.स्टे.चे सपोनि राहुल वाघ यांनी गुरूवारी 13 जुलै रोजी सकाळी लिखित स्वरूपात दिले कि, सदर बाबतीत फसवणुकीचा दखल पात्र गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तर याचवेळी काद्रिनी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मला क्रीमिलर म्हणून संबोधिले असे म्हणत माझे विरुद्ध कोणताही गुन्हा नसतांना तसेच जळगाव न्यायालयाने मला निर्दोष ठरविले. अशा पोलिसावर देखील निलंबनाची कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.