सानिया मिर्झा सातव्य ग्रॅण्डस्लॅमच्या विजयाजवळ

0

ऑस्ट्रेलिया। भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग या जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समांथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ जोडीवर 6-4, 2-6, 10-5 असा विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सुरूवातीला चांगली टक्कर पाहायला मिळाली.हा सामना एकूण 1 तास 18 मिनिटात संपुष्टात आला.

अप्रतिम कामगीरीच्या जोरावर
अखेरच्या सेटमध्ये मिर्झा-डॉडीग जोडीने अप्रतिम कामगिरी करत विजयावर शिक्कोमोर्तब केले. सानिया मिर्झा या विजयासह स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली असून ती आपल्या सातव्या ग्रॅण्डस्लॅम विजयापासून आता केवळ एक पाऊल दूर आहे. समांथा-ग्रोथ जोडीने लिएण्डर पेस आणि मार्टिना हिंगस पराभव केला होता.

मिश्र दुहेरीत सानियाजवळ तीन ग्रॅण्डस्लॅम
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सानिया-डॉ़डीग जोडीसमोर कोलंबियाच्या ज्युआन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अ‍ॅबिगेल स्पीअर्स यांचे आव्हान असणार आहे. सानियाच्या खात्यात मिश्र दुहेरीची तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदं जमा आहेत. 2014 साली सानियाने ब्राझीलच्या ब्रुनो सोअर्सच्या साथीने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. मागील वर्षी सानियाला फ्रेंच ओपन स्पर्धा देखील जिंकण्याची संधी होती.