शहादा। राष्ट्रीय स्तरावरील यूजीसीप्रणित ‘नॅक’ या स्वायत्त संस्थेमार्फत येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. गत 3 ते 5 जुलै दरम्यान नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने भेट देऊन पाहणी केली होती.देशातील विविध विद्यापीठांतर्गत उच्चशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यासाठी यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बंगलोरस्थित नॅशनल अॅसेसमेन्ट व अॅक्रिडेशन कौन्सिल (नॅक) मार्फत त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली जाते.
यांचा होता समावेश
या समितीमार्फत महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेसह शैक्षणिक साधने, सुविधा व अन्य बाबींची तपासणी केली जाते. नॅकमार्फत उच्चशिक्षण संस्थेचा राष्ट्रीय विकासातील सहभाग,जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी विद्याथ्यारची तयारी, मूल्य शिक्षणाची विद्यार्थ्यात रुजवणूक, व्यावहारीक आणि अध्ययन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वोत्तम गुणवत्तेबाबत जिज्ञासा निर्मितीसाठी प्रयत्न या पाच मुख्य निकषांच्या आधारे परीक्षण केले जाते. दि.3 ते 5 जुलै 2017 दरम्यान नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे विविध सात मुद्यांवर आधारित मूल्यांकन केले. महाविद्यालयास भेट देणार्या समितीत हैदराबाद विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. रामैय्या, आसनसोल महाविद्यालय, पश्चिम बंगालचे प्राचार्य डॉ.उदयन सरकार, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.राधेश्याम राय यांचा समावेश होता. समितीने परीक्षणात महाविद्यालयातील विविध शिक्षणक्रम, अध्ययन-अध्यापन व मूल्यांकन, सर्जनशीलता आदि निकषांवर आधारित बाबी तपासून ‘नॅक’च्या मुख्यालयात सादर केला.
स्वप्नपूर्ती झाल्याची भावना
याशिवाय दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट ्रीय छात्र सैनिकांच्या प्रत्येकी सहा विद्याथ्यारची निवड झाली असून सातपुड्याच्या पायथ्याशी विद्याथ्यारच्या कल्याणासाठी सबंध आयुष्यभर झटणार्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक गुणवत्तेबाबत सतत आग्रही असणार्या स्वर्गीय अण्णासाहेबांच्या प्रेरणेने विद्यमान अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष किशोरभाई पाटील, कमल पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व ‘नॅक’ समन्वयक प्रा.डॉ.एम.के. पटेल यांनी दिली आहे.