साने गुरूजी, फडणीस, ठाकरेंच्या लेखणीने पत्रकारिता सुमृध्द

0

जळगाव। आकाशवाणी लेखन करताना विषय, आशय, भावार्थ या तीन बाबींना संहितेत महत्व आहे. तसेच, साने गुरुजी, नानासाहेब फडणीस, प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखणीने खान्देशची पत्रकारिता समृद्ध झाली, असे प्रतिपादन तज्ज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना केले. मू.जे.महविद्यालयातील जनसंवाद आणि वृत्तविद्या विभागात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर शनिवारी घेण्यात आले. मंचावर विभागप्रमुख प्रा. विश्वजीत चौधरी, राजेश यावलकर, प्रवीण चौधरी उपस्थित होते.

वक्त्यांनी मांडला खान्देशातील इतिहास
आकाशवाणीतील लेखन प्रक्रिया – कार्यक्रम, बातमी, श्रुतिका, माहितीपट या विषयी बोलताना माध्यम अभ्यासक डॉ.सोमनाथ वडनेरे म्हणाले की, वक्ता व श्रोता यात प्रतिसाद मिळाला कि संवाद प्रक्रिया पूर्ण होते. श्रोत्याचे मानसशास्त्र लेखनात येवून ते वक्त्याला टिपता आले पाहिजे. प्रभावी संहिता उत्तम सादरीकरणासाठी महत्वाची ठरते, असे सांगत विद्यार्थ्यांशी त्यांनी प्रश्नोत्तरानेही संवाद साधला. लीललरी खान्देशातील पत्रकारिता या विषयी बोलताना जेष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी खान्देशातील पत्रकारितेचा इतिहास मांडत दुर्मिळ अशी माहिती दिली. 1887 साली काव्यरत्नावली मासिक निघाले होते. त्या नावाचा शहरात चौक आहे, मात्र त्यासंदर्भात कुठलीही माहिती चौकात नाही, अशी खंत अनिल पाटील यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्र वाचनामुळे समाज प्रबोधनाची परंपरा वाढली, असेहि त्यांनी सांगितले. प्रस्तावना व आभार प्रा. विश्वजीत चौधरी, सूत्रसंचालन सुकलाल सुरवाडे यांनी केले.