भारतीय लोकशाहीत सर्वात घातक कार्य गुप्तहेर संघटना कसे करते ते धरने दाखवले आहे. त्यांचे कार्य लोकशाही संस्थांच्या नियंत्रणात चालले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. तो काँग्रेसविरोधी होता. त्याने इंदिरा गांधींसाठी अनेक अनैतिक कामे केली. भाजप सरकार हे चांगले काम करेल, अशी त्याची अपेक्षा होती. म्हणून त्याची गोविंदाचार्य बरोबर घनिष्ट मैत्री होती. पण 90च्या दशकात त्याचा भ्रमनिरास झाला. संघ परिवाराने बाबरी मस्जिद पाडण्यासाठी घातकी पद्धतीचा वापर केला. काँग्रेस आणि नंतर भाजपचे घाणेरडे राजकारण त्याने पाहिले. भिन्द्रन्वाल्यांच्या पुतण्या रोडला सुवर्ण मंदिरात त्याने हत्यारे फळांच्या टोपल्यातून पुरवले. आपले अनैतिक आणि बेकायदेशीर काम लपवण्याचा प्रयत्न धर करत नाहीत. खइचे काम अंतर्गत सुरक्षेचे आहे. बहुतेक खइ प्रमुख हे प्रधानमंत्र्यांचे सुरक्षा सल्लागार असतात. जसे आज डोवाल आहेत. डोवाल हे खइचे माजी प्रमुख आहेत. खइ चा जन्म ब्रिटिश खइ मधून झाला. त्याचे पहिले प्रमुख पिल्लई. 1945 ला दुसर्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरू झाले. एकीकडे अमेरिका ब्रिटनचे गठबंधन. त्यात सर्व पश्चिम युरोपियन देश होते, तर दुसरीकडे, सोव्हिएत संघ (रशिया). भारत स्वतंत्र होणार होता. भारत जर सोव्हिएत संघाच्या बाजूने गेला, तर अमेरिकन पराभव निश्चित होता. म्हणून भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटन अमेरिकेने घेतला. ब्रिटिश खइला ते काम देण्यात आले. भारतात हिंदू-मुस्लीम दंगली ब्रिटिश खइने घडवून देशाची फाळणी केली. हा इतिहास आता उघड होत आहे. याच ब्रिटिश खइमध्ये काम करणारे लोक स्वातंत्र्यानंतर भारतीय खइचे प्रमुख झाले. ते पूर्ण अमेरिकन मानसिकतेचे होते. खइ प्रमुख पिल्लईने अमेरिकन गुप्तहेर संघटनांबरोबर संधान बांधले. पुढे जाऊन खइ ही अमेरिकन उख ची शाखाच झाली. ही गोष्ट सरकारला माहीत नव्हती. पुढे जाऊन खइचे दुसरे प्रमुख मुळीक यांनी हेच धोरण चालवले. जनतेपासून खइचे अस्तित्व लपवले होते. बाबासाहेब आंबेडकर, डांगे, पंजाबराव देशमुख, लोहिया सकट अनेक नेत्यांवर खइ पाळत ठेवत होती. चीन, रशिया समर्थक नेत्यांची पूर्ण यादी ते अमेरिकेला पुरवत होती.
भारताबरोबर चीनसुद्धा स्वतंत्र झाला. भारत-चीन घनिष्ट मैत्री होऊ लागली. हिंदी चिनी भाईभाई हा नारा बुलंद झाला. याचा धसका अमेरिकेने घेतला. त्याचदरम्यान पंडित नेहरू/सरदार पटेलना न विचारता मुळीक वॉशिंग्टनला अनेकदा गेले व अमेरिकन गुप्तहेर खाते उख बरोबर चीन विरुद्ध संधान बांधले. सरकारची परवानगी न घेता असे आपल्या मर्जीने घातकी काम करण्याची खइची परंपरा आतादेखील चालू आहे. मुळीकला भारत-चीन संघर्ष घडवून आणण्याचे काम अमेरिकेने दिले. सर्व खोटे अहवाल देऊन पंडित नेहरूंना व विरोधी पक्षांना पेटवून टाकण्यात आले. संसदेत भाषणे झाली. कुठलीही तयारी नसताना सैन्याला लढाईत ढकलण्यात आले. त्यात भारताचा भयानक पराभव झाला. पण अमेरिकेचा उद्देश साध्य झाला. भारत-चीन शत्रू झाले. ही कारस्थाने ज्याने केली त्या खइला मात्र काही झाले नाही. पुढे जाऊन इंदिरा गांधींना या कारस्थानांची माहिती झाली. त्यांनी खइला तोडून टाकले. त्यातून ठ-थ (ठशीशरीलह रपव -परश्रूीळी थळपस) निर्माण केली. ठ-थला परदेशात काम करण्याचे काम दिले व खइ ला अंतर्गत सुरक्षेचे काम दिले. 2008 ला ठ-थ खइला 4 दिवस आधी माहिती दिली होती की, कसाब व टोळी मुंबईवर हल्ला करायला निघाली आहे. पण खइने ही माहिती लपवून ठेवली. जर खइने वेळीच कळवले असते, तर मुंबईचा हल्ला झाला नसता. हा हल्ला करकरे अन् कामते/साळसकरांना मारण्यासाठी झाला असे अनेक लोकांनी मत मांडले. करकरेंची हत्या झाली म्हणून आज साध्वी व कर्नल पुरोहित सुटले हा काही योगायोग नव्हे. काँग्रेस सरकारनी हे प्रकरण दाबून टाकले. देशाच्या बाहेरून जेव्हा हल्ला होतो त्याला महाराष्ट्र पोलीस काय करणार? ते प्रामुख्याने ठ-थ चे काम आहे. ठ-थ ने आपले काम केले, पण खइ ने देशद्रोह केला. पण शिक्षा कुणालाच नाही. माजी मुख्यमंत्री व तत्कालीन खासदार अंतुलेनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला, तर त्यांचे तोंड बंद करण्यात आहे. साधी चौकशीसुद्धा काँग्रेस सरकारने केंद्र शासनाद्वारे केली नाही. करकरेसकट निरपराध लोकांची हत्या काँग्रेस सरकारने दाबून टाकली. इथे धरने कबूल केले की, बाबरी मस्जिद पाडायचे काम त्यांच्या घरातून सुरू झाले. सोनिया गांधींनीदेखील खरे अपराधी शोधून काढण्याचा प्रयत्न हाणून पडला. अनेक राज्यांत काँग्रेस संपली. महाराष्ट्रात तर त्यांची शेवटची घरघर ऐकू येत आहे, मग मी काय ओसाड गावचा राजा होण्यासाठी तिथे जाणार आहे का. सापनाथ काँग्रेस आणि नागनाथ भाजप एकच आहेत. त्या दोघांना तडीपार केल्याशिवाय भारताला वाचवता येणार नाही. म्हणून मला जाहीर करायला भाग पाडले की, काँग्रेस व भाजपविरहित आघाडीची बांधणी मी सुरू केली आहे. त्याला महाराष्ट्राच्या जनतेने साथ द्यावी.
– ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929