सापांना मिळाले जीवदान

0

राजगुरूनगर : शहरामध्ये नागपंचमीनिमित्त काही महिला आणि पुरुष पैसे कमविण्यासाठी नाग घरोघरी फिरून त्याचा शारीरिक छळ करीत असल्याचे काही सर्पमित्रांच्या लक्षात आणि त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वन विभागीचे कर्मचारी वाडा रस्त्यावरील संगम क्लासिक, तिन्हेवाडी रोड टेलको कॉलनी आणि ब्राम्हणआळी या तीन ठिकाणी घटनास्थळी जाऊन 1 नाग 3 दिवड जातीच्या सापांना व 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे जाब जबाब घेऊन त्यानुसार साप विकणारी कोणती टोळी आहे का याचा तपास घेणार असल्याची माहिती वनपरीक्षेत्र निरीक्षक शुभांगी चव्हाण यांनी दिली. यानंतर या नाग व इतर सापांना जंगलात सोडून देण्यात आले. यामध्ये सर्पमित्र निलेश वाघमारे, प्रिया थोरात, सागर कोहिणकर यांच्यामुळे सापांना जीवदान मिळाले आहे.