शहादा । ‘देव त्याला कोण मारी’ ही म्हण वर्षानुवर्षं खरी ठरत आहे. अशी अनेक उदाहरण सर्वश्रृृत आहेत. असाच प्रकार आज रोजी दुपारी साडेचार वाजता घडला. लोहारा ता शहादा येथील हितेश अशोक पाटील हे आपल्या शेतातुन काही कामानिमित्त शहाद्यात आपल्या बजाज पल्सर मोटार सायकलीने आले होते. लोहारा ते शहादा जवळ जवळ 17 कि मी अंतर होते. पण अचानक शहरात स्वामी समर्थ केंद्राजवळ पायाल काहीतरी नरम लागत होते. फुसकारण्याचा आवाज आल्याने हितेश पाटील यांनी खाली वाकुन पाहिले असता आपल्या मोटारसायकलीत साप दिसल्याने त्यांनी लगेच मोटार सायकल सोडली व बाजुला पळ काढला.
सर्पमित्रांच्या प्रयत्नांनी सापास पकडले
हा सारा प्रकार बघता कानबाईचा उत्सव असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. सापाला बाहेर काढण्याची कवायत सुरु झाली. शेवटी साप बाहेर निघत नाही हे पाहुन सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. चार सर्पमित्रांनी प्रयत्न सुरु केलेत. साप मोटरसायकल सिट खाली घुसला. अथक परिश्रमाने त्याला पिशवीत सर्पमित्रांनी जेरबंद केले. सर्पमित्रांनी त्याला मोहिदा शिवाराचा जंगलात सोडले. साप नसुन अडीच फुटाची धुअळ नावाची नागीन होती. जी अत्यंत विषारी असते. सुदैवाने हितेश पाटील हे 17 कि मी अंतर कापुन शहादापर्यंत आले पण नागीनने चाव घेतला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. म्हणून देव तारी त्याला कोण मारी ही म्हण हितेश पाटील यांच्यासाठी लागु पडत आहे. नागीन लोहारा येथील त्यांचा शेतातुन मोटार सायकलीवर चढली असल्याचा अंदाज सर्प मित्रांनी व्यक्त केला. सर्पमित्र प्रयत्न करीत असतांना बघ्यांची मोठी गर्दी केली होती.