साप पिच्छा सोडेना, सहाव्यांदा झाला दंश

0

यावल। यावल तालुक्यातील दहिगावच्या गणेश मिस्त्री या तरुणाचा सापाने गेल्या महिन्यांपासून पिच्छा पुरवला असून तब्बल एक, दोन नव्हे सहाव्यांदा सर्पदंश झाल्याने हा विषय गावासह तालुक्यात चर्चेचा झाला आहे.

मिस्त्री यांना सर्पदंश होत असल्याचा हा भ्रम आहे की वास्तविकतेत त्यांना सर्प दंश करीत आहे हा संशोधनाचा विषय आहे. तीन वेळा घरात, दोन वेळा नैसर्गिक विधीप्रसंगी व एका वेळी घराजवळ व शनिवारी दुपारी पुन्हा दंश झाला.