जळगाव- शहरातील साफसफाई करण्यासाठी आणि कचरा संकलित करण्यासाठी मनपाने वॉटर ग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे. काही ठिकाणी कचरा न उचलल्यामुळे दहा दिवसातच आठ लाखांचा दंड करण्यात आला आहे. तसेच कचर्यासोबतच माती टाकून वजन केल्याच्या कारणावरुन नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
साफसफाई आणि कचरा संकलित करण्यासाठी एकमुस्त मक्ता दिला आहे. मक्तेदाराने 15 व 21 ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. अटी-शर्तींचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. काही भागात कचरा न उचलणे, स्कीप लोडर न लावणे, घंटागाडी वेळेवर न येणे या कारणांमुळे दहा दिवसातच मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीला सुमारे आठ लाखांचा दंड करण्यात आला आहे.
माती भरल्यामुळे नोटीस
संकलित केलेला प्रति टन 849 रुपये निश्चित करण्यात आले आहे. कचर्याचे वजन वाढविण्यासाठी माती टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मक्तेदार वॉटर ग्रेस कंपनीला आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी नोटीस बजावली आहे.