साबरमती नदीत आढळला करोना व्हायरस

देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत जरी असली तरी संकट अजून तळलेला नाही. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ती म्हणजे साबरमती नदीत करोना विषाणू आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांमध्ये करोनाचा संसर्ग आढळून आला आहे.

साबरमती नदीतून ६९४ नमुने, कांकरिया तलावातील ५४९ आणि चांदोला तलावामधून ४०२ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये करोना विषाणू आढळला आहे. नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, असा विश्वास संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्व नैसर्गिक जल स्त्रोतांचे नमुने घ्यावे, कारण व्हायरसचे बरेच गंभीर म्यूटेशन करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये दिसून आले आहेत