नांद्रा । पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील कै.मधुकर कृपाराम वाणी (वय-76) यांचे 27 रोजी वुद्धापकाळाने निधन झाले. येथील (कै.)मधुकर अण्णा वाणी यांचा जन्म .1 मार्च 1942 रोजी सामनेर येथे झाला 7 भाऊ, 4 बहिणी असा परीवाराचा मोठा मुलगा तारुण्य अवस्थेपासूनच वळीलांच्या हातुन व्यवहारात भाग घेऊन वडीलांना मदत करत होते. वडीलांकडे 108 बिगे शेती मोठा शेतकरी अशी वडीलांची ख्याती होती. त्या काळात बैका नव्हत्या त्यांच्या वडीलांकडे कृपाराम वाणी यांच्याकडे सर्व गावातील शेतकरी विश्वासाने आपला पैसा सांभाळायला ठेवायचे. गरजुंना मदत मध्यस्थीची भुमीका व या कुटूंबातील 100 वरील संदस्यांना एकत्र कुटुंबपद्धती कशी टिकवावी हा वारसा कै.मधुकर अण्णा वाणी यांनी आपले वडील कै.कृपाराम वाणी यांच्याकडून घेतला. कुटूंबातील सर्व सदस्य यांच्या सर्व जबाबदार्या सांभाळतात. त्यात लग्न, शिक्षण, शेती अशा जबाबदार्या पार पाडून गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जबाबदार्या सांभाळून गावातील
न्यायालय होते.
माणसात देव शोधणारे आडल्या भिडल्याला मदतीसाठी कधीही धावुन जाणारे व्यक्तीमत्व कै. मधुकर वाणी यांच्यावर समाजवादी विचारा सरणीचे प्रणेते होते. कै.माजी आमदार ओंकार वाघ यांच्यासोबत आपल्या राजकीय कार्यकिर्तीला सुरुवात केली. सामनेर येथील ग्रामपंचायत मधे सदस्य व उपसरपंच पदावर तार विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सदस्य व चेअरमन पदावर 20 वर्ष त्यांनी काम पाहिले. सामनेर गावात कोणत्याही व्यवहारात कै.मधुकर वाणी यांची मोलाची भुमीका पार पाडत होते. आजही त्यांच्या हातुन झालेल्या कार्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. स्वतःच्या कुटुंबाजवळ 108 बिघे शेतजमीन आहे.एक मोठा प्रामाणिक सर्वांना सोबत घेऊन चालाणारे अण्णाच्या जाण्याने गावात एक मोठीपोकळी निर्माण झालेली आहे. ती न भरुन निघणारी आहे.समाजसेवा हिच इश्वर सेवा या मानवतावादी विचार सरणीत कै. मधुकर अन्नानी आपल्या कार्याची ओळख व ठसा आठवणीत ठेवला आहे.कै.मधुकरअन्नाना दोन मुले 1 मुलगी असा परीवार आहे. मोठा मुलगा जि.प.मधे आरोग्य विभागात तर लहान उल्हासनगर येथे स्वताचा व्यवासाय आहे. कुटुंबातील इतर सदस्य ही शेती व आपापल्या व्यवसायात व्यस्थ असतात. गावातील न्यायालय व मध्यस्थी व्यवहारात मध्यस्ती करणारे न्यायालय हरवून गेल्याच्या भावना जुन्या जाणकारांनी व्यक्त केला.आज त्यांचा गंधमुक्ती व उत्तर कार्य आहे.