सामन्यात भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

0

कोलंबो । मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची शानदार शतके आणि या दोघांच्या नाबाद द्विशतकी भागीदारीमुळे भारताने दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 3 बाद 344 धावा अशी होती. चेतेश्‍वर पुजारा 128 आणि रहाणे 103 धावांवर खेळत होते. या दोघांशिवाय तापातून बरा झाल्यावर प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणार्‍या लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी करताना 57 धावा केल्या. सलामीचा दुसरा फलंदाज शिखर धवन 35 धावा काढून बाद झाला. भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांना गुरूवारी खूप घामा गाळावा लागला. सामन्याच्या पहिल्या त्यांना केवळा तिघा भारतीय फलंदाजांना बाद करता आल-

पुजाराला मिळाला प्रसाद
दुसर्‍या कसोटी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या पुजारासाठी गुरूवार अनेक खूशखबर घेऊन आला. राहुल द्रविडशी तुलना केल्या जाणार्‍या पुजाराला यावर्षी भारतीय क्रीडा क्शेत्रातील प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. अर्जुन पुरस्कार समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. फलंदाजीच्या वेळीस 34 वी धाव घेताच पुजाराने कसोटी क्रिकेटमधील 4000 धावांचा टप्पा पार केला. पुजाराने ही कामगिरी 50 व्या कसोटी सामन्यात केली आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा 15 वा कसोटीपटू आहे. एक दिवसात मिळालेल्या या खूशखबरी पुजारासाठी सोने पे सुहागा ठरल्या आहेत.

राहुलचा अर्धशतकांचा षटकार
या सामन्यात लोकेश राहुल 57 धावांवर दुदैवीरित्या धावचित झाला. या अर्धशतकासह त्याने सलग सर्वात जास्त अर्धशतकी खेळी करणार्‍या भारतीय फलंदाजाच्या यादीत राहुल द्रविड आणि गुंडप्पा विश्‍वनाथ यांच्यासह पहिल्या स्थानावर उडी मारली. राहुलचे हे सलग सहावे अर्धशतक आहे. याआधी राहुलने 90, 51, 67, 60 आणि 51 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. धवन, राहुल शिवाय विराट कोहली (1) बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला. कर्णधार दिनेश चंडीमल आजारातून बरा झाला असून तो या सामन्यात खेळत आहे. याशिवाय प्रमुख गोलंदाज रंगाना हेरथही संघात आहे. दुखापतीमुळे हेरथच्या खेळण्याबाबत अनिश्‍चितता होती. प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणार्‍या हेरथला सामन्यातल्या पहिल्या दिवशी विकेट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागली. श्रीलंकेसाठी दिलरुवान परेरा आणि रंगना हेरथने प्रत्येकी एक विकेट मिळवली.