अमळनेर: भिलाली ता अमळनेर येथे कोरोणा तसेच ईतर साथिच्या रोगांवर उपाययोजना म्हणुन सामर्थ्य प्रतिष्ठान च्या वतीने निर्जंतुक फवारणी करण्यात आली.यावेळी संपूर्ण गावातील घरांच्या आजुबाजुचा परीसर,गटारी,स्वच्छतागृह,प्राण्यांचे गोठे,उकीर्डे,ग्रा पं कार्यालय,मंदिर तसेच सार्वजनिक ठिकानी फवारणी करण्यात आली व पदाधिकारी आणि कर्मचार्यांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच गावकर्यांनी विशेषता बाहेरुन आलेले होम क्वारंटाईन लोकांना घरातुन बाहेर न पडण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल माळी,सरपंच छायाबाई पाटील,पोलीस पाटील दगा पाटील,आशा स्वयंसेविका कल्पना माळी,सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील,मा सरपंच दिनेश माळी, ग्रा पं सदस्य भाऊसाहेब राजपुत,कोतवाल सागर पाटील,लोटनसिंग गिरासे,दगडू माळी,छोटु माळी,परेश पाटील उपस्थित होते.