माजी आमदार संतोष चौधरी ; सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम
भुसावळ- सामाजिक उपक्रमासह विविध स्पर्धांमध्ये महिला सक्रिय सहभागी होत असल्याची बाब अभिमानास्पद असून अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये नेहमीच महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार संतोष चौधरी यांनी येथे केले. सखी श्रावणी सखी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित तीन दिवसीय ‘भुसावळ महिला धमाका 2018’ स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. चौधरी म्हणाले की, मंडळास सहकार्य लागत असल्यास आपले नेहमीच सहकार्य लाभेल. महिलांनी अशाच पद्धत्तीने उत्साह कायम ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिला घडवू शकतात परीवर्तन -उमेश नेमाडे
स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. नेमाडे म्हणाले की, शहरातील महिला मंडळ खुप कमी अॅक्टीव आहेत. महिलांनी पुढे यावे. महिला जर संघटीत राहील्या तर समाज हिताचे उपक्रम राबतच राहतील. महिलाच समाज परिवर्तन करु शकतात. समाज हितासाठी व समाजसेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत असे ते म्हणाले.
दर्जा चांगला असल्यास यशस्वी उद्योजक बनाल – रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी दुसर्या दिवशी केलेल्या मार्गदर्शनात सांगितले की, बचत गट जे-जे प्रॉडक्टस तयार करतात त्यांनी आपल्या वस्तुंची क्वालीटी, त्यांची आकर्षक पॅकींग कशी असावी व बाजार भावापेक्षा दोन रुपयांनी आपल्या वस्तुंची किंमत जर कमी ठेवल्यास तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनू शकतात.
संस्थेतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम -राजश्री नेवे
संस्थेच्या संस्थापिका राजश्री उमेश नेवे म्हणाल्या की, संस्थेतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. यापुढे ही समाजासाठी प्रेरक व समाजहिताचे व प्रामुख्याने महिला हिताचे कार्यक्रम नेहमी राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन साक्षी वाणी हिने तर आभार प्रतिभा विसपुते यांनी मानले. यावेळी संस्थेच्या सदस्या व सभासद यांच्यासह पुजा पुल्ला, कामिनी नेवे, अनुराधा टाक, भाग्यश्री नेवे, राधिका वाणी, माया चौधरी, पुजा नेवे, श्रद्धा नेवे उपस्थित होत्या.
स्पर्धेतील विजेते असे
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम- धनश्री इखे, द्वितीय- कुणाल कुलकर्णी. उखाणे स्पर्धेत प्रथम- गायत्री देशपांडे, द्वितीय- स्मिता माहूरकर. मेहंदी स्पर्धेत प्रथम- आराधना टाक, द्वितीय- गायत्री देशपांडे. संगीत खुर्ची स्पर्धा (मुली) प्रथम दर्पणा कुलकर्णी, द्वितीय- भाग्यश्री दलाल. हेअर स्टाईल प्रथम- दर्पणा कुलकर्णी, द्वितीय- आराधना टाक. नृत्य स्पर्धेत प्रथम- प्रचिती कुलकर्णी, द्वितीय- साक्षी कुलकर्णी, तृतीय- पुनम नेवे, उत्तेजनार्थ विशाखा जोशी. मॅचींग स्पर्धा रंजना नेवे, मिस मॅचींग स्पर्धेत मानसी नेवे हे विजेते ठरले.