भुसावळ विभागात रमजान ईदचा उत्साह ; हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा
भुसावळ- ऐ अल्लाह जहां सुका गिरा हैं, वहा अपना खुसुसी फज्ल नाजील फरमा, नफा देणेवाली अब्रे रहमत का नुजूल फरमा’, ‘हमारे मुल्क में अम्न-ओ-अमान अता फरमा, और किसान खेत खुशहाली से भर दे, मौला जल्द से जल्द बारीश का नुजुल फरमा दें’ अशा शब्दांत ‘ईद-उल-फित्र’च्या औचित्यावर शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानासह रावेर शहरातील उब्खेडा रोडवरील ईदगाह मैदानावरून हजारो मुस्लीम बांधवांनी सर्वश्रेष्ठ ‘अल्लाह’च्या दरबारी समाधानकारक पर्जन्यवृष्टी राष्ट्रीय एकात्मता अखंडितपणे जोपासली जाण्यासाठी दुवा पठण (प्रार्थना) केले. नमाज पठणानंतर हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांची गळाभेट रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस प्रशासनातर्फे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
भुसावळात 15 हजार बांधवांचे नमाज पठण
भुसावळ- खडका रोडवरील नवीन ईदगाहच्या आवारात 15 हजार मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मौलाना रेहान रजा यांनी प्रार्थना म्हटली. नमाज पठणानंतर ईदगाह मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, पालिकेतील गटनेते उल्हास पगारे, संजय ब्राह्मणे यांच्यासह नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी रमजान ईद निमीत्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, होमगार्ड प्रमुख नरविरसिंग रावळ आदींनी मुस्लीम बांधवांना गुलाबाची फुले देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
भुसावळात 15 हजार बांधवांचे नमाज पठण
भुसावळ- खडका रोडवरील नवीन ईदगाहच्या आवारात 15 हजार मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मौलाना रेहान रजा यांनी प्रार्थना म्हटली. नमाज पठणानंतर ईदगाह मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, पालिकेतील गटनेते उल्हास पगारे, उद्योजक मनोज बियाणी, संजय ब्राह्मणे यांच्यासह नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, होमगार्ड प्रमुख नरविरसिंग रावळ आदींनी मुस्लीम बांधवांना गुलाबाची फुले देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पालिकेचे गटनेते हाजी मुन्ना तेली, साबीर मेंबर, मुन्वर खान, माजी नगरसेवक आशिक खान शेर खान, शाहीद रजा, सलीम पिंजारी यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेरमध्ये देशभरात शांततेसाठी प्रार्थना
रावेर- मानवतेची शिकवण आणि आत्मशुद्धीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणार्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या 1 तारखेला बुधवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. सकाळी साडेआठ वाजता जामा मशीदचे इमाम हाफीज सईद यांनी प्रथम खुतबा पठण करून नमाज पठणाला प्रारंभ केला. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, देशात सर्वत्र शांतता नांदू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद , भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीष गणवणी, ज्ञानेश्वर महाजन, अॅड.एम.ए.खान, उपनगराध्यक्ष असद खान, नगरसेवक अय्युब खान, सादीक शेख, ग्यास शेख, युसूफ खान, शीतल पाटील, दिलीप कांबळे, पोलिस पाटील लक्ष्मीकांत लोहार, जगदीश घेटे, राजेंद्र अटकाळे, ग्यास काजी उपस्थित होते. यावेळी मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या. पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक पाळदे, गोपनीय शाखेचे राजेंद्र करोडपती, मंदार पाटील, हवालदार बी.डी.सोपे, विकास पहूरकर, नंदकुमार, डी.डी.चौधरी, चंद्रकांत शिंदे, योगेश चौधरी यांची उपस्थित होती.
तालुक्यात ईद उत्साहात साजरी
तालुक्यातील रसलपूर येथील शाही ईदगाह मैदानावर सामूहिक पवित्र रमजान ईदनिमित्त नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान ईदनिमित्ताने रसलपूर येथील मशीदीत मौलाना यांनी ईद उल फित्रची नमाज पठण केले. यावेळी सुरेश धनके, सरपंच हनीफ खान, पी.के.महाजन, सचिन जाधव, शरीफ बेग, असलम नजीर उपस्थित होते. तालुक्यातील पाल येथे शाही ईदगाहात मौलाना शरीफ यांनी ईदची नमाज पठण केले. सरपंच कामील तडवी व सदस्य तसेच पाल दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक नाजीम शेख व सहकारी उपस्थित होते. कर्जोद येथेही ईदची नमाज सुन्नी मशीदद व मदीना मशीदीत अदा करण्यात आली. खानापूर गावातही ईद उत्साहात साजरी करण्यात आली. तंटामुक्त समितीचे सदस्य खलिल शे.दादामिया यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कुमार नरवाडे, प्रवीण शिवरामे, योगेश्वर महाजन, दिलीप पाटील, रवींद्र भारते, दिवाकर पाटील आदी उपस्थित होते.