चाळीसगाव। बुधवार 19 रोजी धुळे येथे सामाजिक ऐक्य परिषद संदर्भात स्वाभिमानी भारत अभियान संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक धर्मभूषण बागुल यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे यासाठी बैठकीत आवाहन करण्यात आले. 13 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 13 ऑगस्टचा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व अधिकारी कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.