पुणे : माणसांनी नसत्या भानगडी करू नये, व्यसनं करू नये म्हणून संतांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारूडं लिहिली असे सांगत निरंजन भाकरे यांनी आत्ताच्या पिढ्यांमध्ये समाजात ज्या अनिष्ठ चाली रूढी व्यसनं सवयी आहेत त्यावर बोट ठेवत, आधुनिक दाखले देत वासुदेव, बुरगुंडा, बहुरूपी व नंदी हे काही भारूड प्रकार सादर केले.
सामाजिक चाली, परंपरांवर भाकरे यांनी आपल्या भारूडातून नर्म विनोदाद्वारे बोट ठेवून आधुनिक भारूड सादर केले. भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित निरंजन भाकरे यांच्या भारूड कार्यक्रम सादर झाला. भाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले. सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा 66वा कार्यक्रम होता.