सामाजिक न्याय हक्कांसाठी बहुजनांनी एकत्र येण्याची गरज

0

रावेर। स्वातंत्र्य व सामाजिक न्याय व हक्क मिळविण्यासाठी दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजाने एकत्र येणे ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे जळगाव जिल्ह्याचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी शुक्रवार 9 रोजी रावेर येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या समारोपप्रसंगी केले. रावेर येथे तहसिलदार कार्यालय बहुजन क्रांती मोर्चातर्फे काढलेल्या मोर्चेकरांसमोर सपकाळे बोलत होते.

तहसिलदारांन निवेदन
येथील छोरिया मार्केटपासून जिल्ह्याचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, तालुका संयोजक उमेश गाढे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा निघाला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला, पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा तहसिल कार्यालयाजवळ आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मोर्चेकर्‍यांतर्फे तहसिलदार विजयकुमार ढगे यांना मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात तालुका संयोजक उमेश गाढे, सदस्य राजू सवर्णे, नगिनदास इंगळे, पंकज वाघ, रज्जाक पहेलवान, काझी, सुरेश तायडे, जगदिश घेटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, फौजदार ज्ञानेश फडतरे, दिपक ढोमणे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.