सामाजिक परिवर्तनवादी संघर्ष समितीचा प्रेरणा मेळावा

0

तळोदा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळोदा शहराला 30 जुलै 1937 साली भेट दिली होती आणि या घटनेला येत्या 30 तारखेला 80 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्त तळोदयातील सामाजिक परिवर्तनवादी संघर्ष समितीतर्फे वामनराव बापूजी मंगल कार्यालयात प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

80 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तळोदा शहर व तालुक्याला भेट देवून सामाजिक उत्थानाची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे येत्या 30 तारखेला सर्वधर्मनिरपेक्ष, पुरोगामी जनसंघटना व पक्ष एकत्र येवून प्रेरणा दिन साजरा करणार आहेत तसेच सामाजिक परिवर्तनवादी संघर्ष समिती तर्फे वामनराव बापूजी मंगल कार्यालयात प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून नंदुरबारचे माजी डीएसपी संजय अपरांती उपस्थित राहणार आहेत. तरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती सामाजिक परिवर्तनवादी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.