भुसावळ । समाजात वाढत्या बहिष्काराविरुध्द महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती समाजाचे प्रबोधन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. असे असतांनाही जात पंचायतीद्वारे विविध शिक्षा ठोठावून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रकार सातत्याने सुरु आहे. काहींनी याविरुध्द हिंमत करुन आवाज उठविला असला तरी अंतर्गत अशी पध्दत मोठ्या प्रमाणात राबविण्यात जात पंचायत पुढाकार घेत आहे. याविरुध्द शासनाने अशा जात पंचायतीच्या म्होरक्यांची यादी जिल्हा कार्यालयात नोंद ठेवावी, अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात आंदोलनदेखील करण्यात येणार असल्याचा ठराव अरुण दामोदर, शामकुमार वासनिक, सागर बहिरुणे, भगवान निरभवणे, शांताराम जाधव, अंजना निरभवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.