शिरपूर । आज देशामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक वातावरण बिघडले आहे. जातीयवाद,जातीधर्मातील भांडणाचा परिणाम देशाच्या विकासावर होतो.म्हणून सामाजिक एकता,बंधुभाव असणे आवश्यक आहे. बोराडी येथील कर्मवीर नगर मित्रमंडळामार्फत शिवजयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,ईद,गणेशोत्सव निमित्ताने घेण्यात येणारे कार्यक्रम कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन बोराडी येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक रंधे यांनी केले. बोराडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात मिरवणूकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमीत्ताने कर्मवीर नगर मित्रमंडळामार्फत कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मंडळातर्फे सर्वधर्मीय कार्यक्रमांचे आयोजन
मंडळामार्फत सर्वधर्मीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक एकोपा वाढला पाहीजे यासाठी कार्यक्रम घेण्यात येतात. यावेळी अशोक पवार,व्ही.ए.पाटील, रविंद्र शिंदे, रविंद्र मोरे, गणेश भामरे, संजय पवार,गोकुळ पाटील,हिंमत पवार,विशाल पावरा,चंद्रशेखर सोनवणे,अरविंद भामरे,नाजिम शेख,नरेंद्र बाविस्कर,पंकज पाटील,योगेश सगरे,आनंदा चौधरी,सुनील सामुद्रे, गणेश पटेल,छोटु बावा,विनेश पावरा,मयुरेश भामरे,इ उपस्थित होते. या उपक्रमाचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे,भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, मगन पवार, चिंधा कुवर,शामकांत पाटील, शशांक रंधे,विजय सत्तेसा,यांनी कौतुक केले. यावेळी आभार गणेश भामरे यांनी मानले.