सामाजिक संवेदनेत विद्यार्थ्यांना भरारीची मदत

0

जळगाव । भरारी फाऊंडेशन वतीने सामाजिक संवेदना जागृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 110 मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषणाची जबाबदारी भरारीसंस्थेच्या वतीने घेण्यात आली. 25 जून सकाळी 10 वाजता रोटरी सभागृहात जिल्ह्यातील अधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. डोळ्याचे पाळणे फेडणार्‍या कार्यक्रमात जळगावकरांनी देखील आपली साक्ष नोंदवली.

देणार्‍याने देत जावे…….
देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे ! घेता घेता देणा:याचे हात व्हावे या कवितेच्या ओळी आठवून अनेक दात्यांचे हात मदतीसाठी नेहमी पुढे असतात असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्या आत्महत्या ग्रस्त मुले व महिला यांनी देखील समाजाचे देणे लागतो म्हणून कोणच्या तरी मदतीस व्हावे, जेणे करून समाजाने आपल्याला शिखरावर पोहचण्यास मदत केली हे स्पष्ट होईल.

52 महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन
गणपती नगर येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये रविवारी भरारी फाऊंडेशनतर्फे संवेदना जागृती सोहळ्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पिडीत लेकरांना शालेय साहित्यांचे वाटप झाले. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त वारस 52 निराधार महिलांना उपजीविकेच्या साधनासाठी सक्षम व्हावे, यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांनी उभारी देत स्वावलंबी होण्याचे आवाहनात्मक मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, केशवस्मृती समुहाचे भरत अमळकर, उद्योजक रजनीकांत कोठारी, जळगाव रोटरी क्लब ऑफ ईस्टचे अध्यक्ष संजय शहा, जळगाव विभागाचे उपअधीक्षक सचिन सांगळे, नंदलाल गादीया, नरेंद्र खंडेलवाल, अ‍ॅड़़केबी़वर्मा, जितेंद्र कोठारी, विजय लाठी, स्मिता बाफना, सचिन जेठवानी, वासुदेव पारपियानी मान्यवर उपस्थित होत़े प्रास्ताविकात भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याभरात सुरु असलेल्या कार्याबाबत आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली. आज पर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या मदतीला भरारी धावून आली आहे. पुढे सुद्धा अनेक समाज उपोयोगी कार्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महिलांना मिळणार रोजगार
भरारी फाऊंडेशनच्यावतीने महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिपक परदेशी यांनी सांगितले. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षात राज्यभरात शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या केल्या त्यामुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येण्याची पाळी आत्महत्त्याग्रस्त कुटुंबावर आली होती. येणार्‍या दोन वर्षात त्यांच्या परिवाराचा आधार म्हणून भरारी फाउंडेशन पुढाकार घेईल. असा विश्‍वास मान्यवरांनी देखील व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामचंद्र पाटील यांनी केले.