सामाजिक संस्थांनी समाजात नेहमी काम करणे गरजेचे -एकनाथराव खडसे

0

खिर्डी गावात तत्पर फाउंडेशन उद्घाटन

खिर्डी- सामाजिक संस्थांनी नेहमी समाजात चांगले कार्य करणे गरजेचे असून समाजात चांगले काम करतांना अनंत अडचणी येतात मात्र त्या न पाहता समाजात पुढे नेहमी कार्य करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे केले. तत्पर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आपल्यावर अनेक आरोप झाले व तशा बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या मात्र सर्व आरोपातून निर्दोष बाहेर पडल्याने आता माध्यमांची दुसरी बाजू मांडण्याची जवाबदारी असल्याचे खडसे म्हणाले.

जेनरीक मेडिकल देण्याची खासदारांची ग्वाही
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, ग्रामीण भागात फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारच्या योजना पोहचल्या पाहिजे त्यासाठी जी ही मदत लागेल ती करण्यास तयार आहे. तसेच जेनरीक मेडीकल देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. परीसरातील 11 पत्रकारांनी एकत्र येत संस्थेची केलेली स्थापना कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी तत्पर फाउंडेशनला कोणतीही मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
सीएमडी पर्सन ओजिओक्रिस्ट ऑर्गनिक्स लिमिटेड मुंबईचे नंदकुमार भिरुड,ि पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे रावेर तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, पंचायत समिती सदस्य कविता हरलाल कोळी, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे, निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी उपसभापती दुर्गादास पाटील, खिर्डी बुद्रुक सरपंच चंद्रकांत कोळी, खिर्डी खुर्द सरपंच ज्योतीबाई कोळी, खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील, खिर्डी बुद्रुक पोलीस पाटील अरुण पाटील, उपसरपंच नीळकंठ बढे, योगेश जाधव, हरलाल कोळी, ग्रामपंचायत सदस्य माधुरी नेमाडे, खिर्डी तलाठी वाय.एच.नाहरदे, खिर्डी बुद्रुक ग्रामसेवक डी.आर.जयंकार, सर्कल तडवी, शमीम बी.शेख अस्लम, फरजानाबी शेख जाबीर, विनोद कोळी, शमीम बी.शेख असलम, मोहिनी नेमाडे, पंकज राणे, वैशाली पाटील, गंभीर पाटील, आशा पाटील, उषाबाई तायडे, घनश्याम पाटील, गोपाळ पाटील, विनोद पाटील, पवन चौधरी, गफूर कोळी, शेख अस्लम, किरण नेमाडे, रफिक बेग, योगेश कोळी, अकिल शेख, अन्वर बेग, शेख शब्बीर, जाबीर बेग, याकूब बेग, चवादास पाटील, पांडुरंग पाटील, रतीरा तायडे, उत्तम तायडे, नारायण तायडे, अशोक पाटील, संतोष तायडे, अर्जुन तायडे, साजीद खान, शेख काय्यूम, आसीफ बेग तसेच तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी, सचिव प्रवीण धुंदले, सहसचिव सतीश फेगडे, सदस्य प्रदीप पंजाबी, शेख इद्रीस, कांतीलाल गाढे, संकेत पाटील, सादिक पिंजारी, रीतेश चौधरी, अंकित पाटीलसह शेकडोंच्या संख्येने परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अयाझ मोहसीन यांनी तर प्रस्तावना चंद्रकांत कोळी तसेच आभार गुणवंत पाटील यांनी मानले.