सामाजिक संस्थेला पोलिसांचा जाच होत असल्याची तक्रार

0

धुळे । येथील भिवसन नगरातील सुरेश भिला सोनार यांनी कै.न्हानु पहिलवान सोशल क्रीडा मंडळ संस्थेला पोलिसांचा जाच होत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी तसेच गृहमंत्रालयाकडे केली आहे. या तक्रारीत सुरेश सोनार सोशल क्रिडा मंडळाला पोलिसांचा जाच सुरेश सोनार यांची अधीक्षकांकडे तक्रार यांनी म्हटले आहे की, सदर संस्था ही नोंदणीकृत असून तरुणांमध्ये खेळाची व शारीरीक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती तसेच बैठे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेमार्फत चालविले जातात.

संस्थेला सहाय्यक आयुक्त यांनी मान्यता दिली असून दरवर्षी ताळेबंद आयुक्त कार्यालयात जमा करण्यात येतो. असे असतांना कुठलीही तपासणी न करता सराईत गुन्हेगारापेक्षा हीन वागणुक आम्हाला दिली जात असून जुगार अ‍ॅक्ट लावुन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकाराची संपूर्ण शहानिशा करुन न्याय द्यावा असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सुरेश सोनवणे, अशोक आघाव, लखन चांगरे, गणेश सावंत, गणेश माडगुळकर, चंद्रकांत बोरसे, शरद सोनवणे, अनिल माडगुळकर,भुषण काकडे यांची नावे आहेत.