सामाजीक क्षेत्रातील महिलांचा सन्मान

0

तळेगाव दाभाडे : समाजामाधील तळागाळातील जनतेच्या सेवेचे वृत्त घेऊन काम कारणार्‍या महिलांचा सन्मान येथील वीरांगना महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आला.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वीरांगना महिला बचत गटाच्या माध्यमातून नाना नाणी पार्क येथे सदर कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, राजमाता जिजामात मंचाच्या संस्थापिका सारिका भेगडे, वीरांगना महिला बचत गटाच्या संस्थापिका नीलिमा दाभाडे, सारिका शेळके, नगरसेविका शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, विभावरी दाभाडे,स्त्रीयावरील अन्याया विरुध्द आवाज उठविणार्‍या अमृता भंडारी, संध्या गाडे, वीणा दाभाडे, ज्योती दाभाडे, मोहिनी भेगडे,ज्योती जाधव, रजनी ठाकूर, चारुशीला काटे आदि महिला उपस्थित होत्या.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम कारणार्‍या महिलांचा मान्यवारांच्या हस्ते साडी,चोळी, श्रीफळ देऊंन सन्मान करण्यात आला. यावेळी स्त्रीयावर होणार्‍या अत्याचाराबाबत तसेच महिलांना विविध व्यवसाया बाबत माहिती संध्या गाडे व अमृता भंडारी यांनी दिली. स्वागत साधना भेगडे यांनी केले,सूत्रसंचलन चारुशीला काटे यांनी केले, अभार रजनी ठाकूर यांनी केले.