कोथरूड । सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवून भाजप पुणे शहरात काम करत असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रभाग क्रमांक 13 येथील शेतकरी आठवडे बाजाराच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, राधाबाई अॅग्रो फार्मस प्रोड्यूसर कंपनी आणि क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील पटवर्धन बाग येथे शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, राधाबाई अॅग्रो फार्मसचे संचालक शांताराम रायकर, कार्यकारी संचालक निलेश रायकर, कर्वेनगर वारजे प्रभाग समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे आदी उपस्थित होते.