जळगाव । जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे धोबीघाट कंपाऊडमधील व बाहेर वृक्ष लागवडीचा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक सुनील भामरे व चेअरमन दत्तात्रय चौधरी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी वड, पिंपळ, निंब, जांभुळ आदी रोपे लावण्यात आली. यावेळी डॉ. जयकर, डॉ. मिलिंद बारी, संस्था सचिव के.डी.पाटील, संचालक सुभाष सोनवणे, पी.के.पाटील, कमलाकर राठोड, देविदास भास्कर, ज्ञानदेव पाटील आदि उपस्थित होते.