भुसावळ- यावल तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय महिलेवर भुसावळात झालेल्या अत्याचार प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात दाखल झालेला गुन्हा गुरुवारी रात्री यावल पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, पीडीतेला तीन संशयीतांनी 8 रोजी पहाटे पावणेतीन वाजता दुचाकीवर नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे. यावल पोलिसांनी बर्हाणपूर येथील एका संशयीतास चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताने आपण या तरुणीची मदत केल्याचेे पोलिसांना सांगितले असून त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे तर पीडीतेच्या जवाबानुसार संशयीतांचा शोध घेवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी म्हणाले.