सामूहिक नमाज पठण; पुण्यातून १७ जण ताब्यात

0

पुणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जमावबंदीचे देखील आदेश आहेत. गर्दी हाऊ नये यासाठी प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आलेली आहे. मात्र पुण्यातील गणेश पेठ परिसरात या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

सामूहिक नमाजसाठी एकत्र आलेल्या १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन असतानाही नमाजसाठी एकत्र आलेल्या पुण्यातील गणेश पेठेतील एका धार्मिक स्थळावरून १७ जणांना ताब्यात घेतले आहे. या १७ जणांपैकी काही जण हे मुळचे रांचीचे रहिवासी आहेत तर ४ जण स्थानिक असून कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वांना कोरोना चाचणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.