सामूहिक रजा आंदोलन स्थगित

0

नवी मुंबई । समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी पालिका मुख्यालयावर धडक देत बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाने सुरूवात केली.या आंदोलनाला 500 हून अधिक कामगारांनी हजेरी लावल्याने पालिका परिसरात एकच खळबळ माजली. यावेळी आयुक्तांनी एक महिन्यात दखल घेण्याचे आश्वासन दिले असता आंदोलन मागे घेण्यात आले.

ज्यांनी 2003 साली 6500 कामगारांच संसार उध्वस्त केले आणि स्वताच्या झोळया भरल्या अशा सर्वांच्या पार्श्‍वभागावर लाथ मारून पुन्हा सर्वांनी लढाईसाठी सज्ज व्हा, असे आव्हान करत समता कामगार संघाचे सचिव मंगेश लाड यांनी सोमवारपासून आंदोलनाचे रणशिंग फुंकले.या आंदोलनाला सोमवारी सकाळी सुरूवात झाली असता 500 हून अधिक कामगारांनी या आंदोलनात हजेरी लावली.

समता कामगार संघाचा इशारा
आंदोलन सुरू असताना संघाने मागण्यांचे पत्र घेऊन मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावर त्यांनी सादर झालेल्या मागण्यांच्या विचार करत एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे आलेल्या शिष्टमंडळाला सांगितले. यावर एक महिना वाट बघून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा पुढील 21 तारखेपासून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लाड यांनी दिला.