सामूहिक विवाहसोहळ्यात सात जोडपे विवाहबध्द

0

जळगाव : अमर शहिद संत कंवरराम ट्रस्टच्या वतीने संत बाबा हरदासराम साहब यांच्या 113 व्या जयती निमित्ताने सामूहिक विवाह सोहळा व विविध आयोजन करण्यात आले होते़ या विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाह बंधनात बांधले गेले. यावेळी विवाह सोहळ्यासाठी जबलपूर, किशनगढ, सूरत, धुळे, पिंपरी, अमरावती, मलकापूर, भुसावळसह राज्यभरातील मान्यवरांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती. रविवारी सकाळी 5 वाजता देवरी साहब यांचे पंचामृत स्नान करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. सकाळी 10 वाजता पूज्य सेवा मंडळापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली़ या शोभायात्रेत अग्रभागी कवरनगर परिसरातील शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मध्यभागी संत बाबा हरदासराम साहेबांची पालखी व सत सतरामदास साहब, संत कंवरराम साहब, संत बाबा हरदासराम साहब, संत बाबा गेला राम साहबांची तैल चित्रे होती.

बीएचआर महिला मंडळाचा सहभाग
घोड्यावर स्वार संत बाबा हरदासराम आणि संत गेलाराम यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी होते. शोभायात्रेत बीएचआर महिला मंडळाच्या भगिनी रतन जाधवाणी व त्यांच्या सहकार्यांनी शोभायात्रेत संतांचे भजने सादर केली. तसेच ठिकठिकाणी तिर्थप्रसादाचे वाटप करुन शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यानंतर संत बाबा हरदासराम समाज मंदिरात उपस्थि वधू पक्षातर्फेवर पक्षाचे स्वागत करण्या आले. पूज्य सेवा मंडळात शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

भंडार्‍यांचे आयोजन
त्याचप्रमाणे दुपारी 1 वाजता सेवा मंडळात अखंड पाठ साहबची समाप्ती करण्यात आली. त्यानंतर भोजन भंडार्‍याला सुरवात झाली असून दुपारी 2 वाजता स्वागत समारोहाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पंचायतींचे पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई राजेश कुमार (अमरावती) यांनी नव विवाहितांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रात्री एक शाम बाबा के नाम हा संताच्या जीवनावर आधारीत भजनांचा कार्यक्रम पार पडला़

भक्तांची उपस्थिती
यावेळी अमरावती हून आलेले साई राजेशकुमार व संत बाबा गेलाराम साहेबांचे शिष्य देवीदास भाई, पूज्य डहरकी दरबारचे ठाकुरदास पुजारी, पूज्य सिंधी पंचायतचे सर्व पदाधिकारी व सदस्य अमर शहिद संत कंवरराम ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदसय्य तसेच बीएचआर मंडळचे सर्व सदस्य एसएमडी मंडळाचे सदस्य, बाबाचे भक्तांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.