सामूहिक विवाहांसाठी पुढाकार हवा- ना. सुभाष भामरे यांची अपेक्षा

0

जळगाव। समाजामध्ये सामूहिक विवाह महत्वाचे आहेत. सामूहिक वधू-वर परिचय मेळाव्यांसाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. या जिल्ह्यातील लोकांशी माझे वैद्यकिय सेवेमुळे जवळचे नाते आहे. अशाच संबंधांच्या बळावर मोठा झालो आणि पहिल्यांदाच लोकसभेत जाऊन मंत्री झालो असे उद्गार े केंद्रीय संरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी मराठा मंगल आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात काढलेे. मराठा समाजाच्यावतीने ना. सुभाष भामरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर आमदार सतीश पाटील, माजी आमदार बी. एस .पाटील , तिलोत्तमा पाटील, जि.प अध्यक्ष उज्ज्वला पाटील , माजी आमदार दिलीप सोनावणे, विद्या पाटील, राजेश पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

मला केंदीय मंत्रिपद; राजकीय धक्का
खान्देशातील मातीशी माझे आपुलकीचे नाते आहे. समाजाने आपल्याला घडविले यासाठी समाजाचे देणे लागतो . समाजामध्ये नोकरवर्ग मोठया प्रमाणावर आहे. यामुळे शेती करणार्‍या मुलांना दुर्लक्षित केले जाते. या परिस्थितीला आपणच जबादार आहोत. शेतकर्‍याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. या मातीचे उपकार फेडणार असल्याचे ना . सुभाष भामरे म्हणाले, माझी केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड हा महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकीय धक्का होता कारण पंतप्रधान मोदींकडे कोणाचाही वशिला चालत नाही. खूप कामे खान्देशात करायची आहेत , असेही ते म्हणाले.

सारा महाराष्ट्र केंद्राकडे आशेने पाहतोय !
राज्यातील राष्ट्रवादीच्या सहकार्‍यांना सस्पेंड करण्यात आले आहे. आम्ही शेतकर्‍यासाठी भांडत आहोत आपण पंतप्रधान मोदींच्या जवळ असतात . शेतकर्‍याची परिस्थिती बिकट आहे. केंद्राने एकदा महाराष्ट्राकडे पहावे अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी केंद्रीयमंत्री सुभाष भामरे यांना केली आहे. सारा महाराष्ट् केंद्राकडे आशेने पाहत आहे. यासाठी आपण लक्ष घालावे असे आवाहन आमदार पाटील यांनी ना. भामरेंना केले.

शेतकर्‍यांना पसंती देणार्‍या तरुणींचे कौतूक
मराठा मंगल संस्थेच्यावतीने मराठा समाज वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 18 ते 73 वयोगटाच्या एकूण 1700 उमेदवाराची नोंदणी करण्यात आली आहे. परिचय देताना काही युवतींनी शेतकरी नवरा असला तरी लग्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून या विच2ाराचा आदर केला. जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . समाजाचे संकेतस्थळ तसेच परिचय सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभू पाटील यांनी केले.