सामूहिक विवाह योजनेची अंमलबजावणी करा

0

धुळे। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची सभा झाली.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव जे. ए. शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी. एन. शिंपी, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेचे एल. आर. राठोड, समितीचे सदस्य प्रा. डॉ. उषा साळुंखे, प्रा. फरीदा खान, मीना भोसले, श्रीमती दीना चौक, आदी उपस्थित होते.